Share

“एकीकडे कामावर या, म्हणता आणि दुसरीकडे बदल्या काय करता?” ; औरंगाबाद प्रशासनाविरुद्ध एसटी संपकरी संतप्त

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर बुधवारी (दि.२२) तोडगा निघण्याची शक्यता आहे. उद्या होणार्‍या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करू. मात्र ज्यांना आम्ही वकील पत्र दिलेले आहे असे ॲड. गुणरत्न सदावर्ते जो निर्णय घेतील त्यानंतरच आमच्या या ‘दुखवट्या’ची पुढील दिशा ठरवली जाईल. अशी माहिती औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकातील संपकऱ्यांनी दिली. तसेच ‘एकीकडे कामावर या, म्हणता आणि दुसरीकडे बदल्या काय करता’, अशी संतप्त प्रतिक्रिया औरंगाबाद प्रशासनाविरुद्ध यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

७ नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज दीड महिना उलटूनही सुरूच आहे. या कालावधीत राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे अमिष देखील देण्यात आले. मात्र विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपला हा संप तसेच दुखवटा सुरूच ठेवला आहे. न्यायालयाने राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीस इतर संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून २० डिसेंबरपर्यंत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार २१ डिसेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली. मात्र वेळेअभावी सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आता न्यायालयाने २२ डिसेंबर रोजी पुढची तारीख दिली आहे. ज्या संघटनांनी आत्तापर्यंत माघार घेतली आहे. त्यांचे राज्यभरात मोजकेच सदस्य होते. त्यामुळे आमच्या या संपावर त्याचा काही फरक पडणार नाही. अशी भावना औरंगाबाद येथील संपकऱ्यांनी व्यक्त केली.

परिवहन मंत्र्यांच्या निर्णयाला केराची टोपली

परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना रुजू होण्याचे आवाहन केले होते. रुजू झाल्यास निलंबन मागे घेण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले होते. त्यानुसार औरंगाबाद विभागात काही कर्मचारी रुजू होण्यासाठी गेले असता, मंगळवारी औरंगाबाद आगार क्रमांक १ येथील रुजू होण्यासाठी गेलेल्या ५ कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेशही देण्यात आले. त्यामुळे संपात सहभागी झालेल्यांवर प्रशासनाकडून अशा प्रकारे सूड उगवला जात असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!