🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या संसर्गाला आळा बसावा म्हणुन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाउन जाहीर केले आहे. या काळात मालिका आणि चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परवानगी नाकारण्यात आली होती.
यामुळे अनेक मालिकांनी चित्रीकरणासाठी दुसऱ्या राज्याचा पर्याय स्विकारला. ‘सूर नवा ध्यास नवा’ या कलर्स मराठीवरील मालिकेचे चित्रीकरण गोव्यात मडगांव येथील रवींद्र भवनमध्ये सुरू आहे. मात्र या कार्यक्रमाच्या सेटवर जाउन गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोंधळ घालत चित्रीकरण थांबवण्याची मागणी केली आहे.
WHO GAINS WHEN FATORDA LOSES? https://t.co/yYXxEXP3Ga Ravindra Bhavan permission for Film Shootings with people not following social distancing & other CovidSOPs needs to be probed! How District Adminstration & Police, enforcing restriction guidelines, ignored these violations?
— Vijai Sardesai (@VijaiSardesai) May 5, 2021
मडगांव आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत येथे चित्रीकरण करणे योग्य नसल्याचे मत आमदार सरदेसाई यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे कोरोना नियमाचे पालन केले जात नसल्याचा आरोपही आमदार सरदेसाई यांनी केला आहे. आमदार सरदेसाई यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आणि त्यांची भूमिका मांडली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोरोना लढ्यासाठी विदेशातून आलेल्या निधीचे काय झाले?’, राहुल गांधींचा मोदींना सवाल
- सुत्रे हाती घेताच ममतांकडून बंगालमध्ये कठोर निर्बंध
- ‘आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही’ : केदार शिंदे
- पोलिसांनी चक्क रुग्णालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना केली मारहाण!
- बीडमध्ये १ हजार ४३९ कोरोना रुग्णांची वाढ तर १ हजार १४० जणांनी केली कोरोनावर मात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

