औरंगाबाद : भाजपवर आ. संजय गायकवाड यांनी खोटे आरोप लावल्याचे म्हणत शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी पुंडलिकनगर भागात रविवारी संध्याकाळी त्यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.
आ. संजय जाधव यांनी भाजप नेत्यांवर टीका करत, त्यांच्यावर आरोप केले होते. त्या आरोपाचे खंडन करून त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुंडलीकनगर भागात आज संध्याकाळी आ. संजय गायकवाड यांचे छायाचित्र आणून त्या छायाचित्राला भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला जोडे मारो आंदोलन केले.
यावेळी भाजप शहरजिल्हाध्यक्ष संजय केनेकर, संघटन सरचिटणीस राजेश मेहता, मंडळ अध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे, महिला मोर्चा अध्यक्षा अमृताताई पालोदकर, मनीषा मुंडे , मंगलमूर्ती शास्त्री, हापिज शेख, दिव्याताई पाटील, धनंजय पालोदकर, निरज जैन, प्रतिभा जऱ्हाड, शिवगंगा जायभय, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
- “स्व.बाळासाहेबांच्याच शब्दात बोलायचं तर हे ‘येड#$%’ सरकार आहे”; नितेश राणेंचा टोला
- ‘अरे जनाबसैनिका, मंदबुद्धी…ते जंतू नसतात विषाणू असतात’
- लातूरमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची आता होणार कोरोना चाचणी
- उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनासह सारीचा कहर; रुग्णालये खचाखच!
- इंग्लंडला जाण्याआधी राजस्थान रॉयल्सनं बेन स्टोक्सला दिला भावुक निरोप !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

