Share

चक्क टीशर्टवर प्रिंट केलं कोरोना वॅक्सिनेशनचं प्रमाणपत्र, वाचा काय आहे प्रकरण

Published On: 

मुंबई : सध्या महाराष्ट्रावर तिसऱ्या लाटेचे संकट आहे. त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाही. जे नियम सध्या लागून आहे ते तसेच राहणार आहे, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.

तसेच बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या पुढे दोन डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी महाराष्ट्रात येणाऱ्यांकडून आरटीपीसीआर चाचणीचे सर्टिफिकेट घेतले जात होते. मात्र, आता या पुढे ज्यांनी कोरोनाच्या दोन लस घेतल्या असतील आणि ज्यांच्याकडे तसे सर्टिफिकेट असेल त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 ऑगस्टपासून कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना लोकलने प्रवास करता येणार असल्याची घोषणा केली आहे. यावरुन आता स्डँडअप कॉमेडिअन अतुल खत्री यांनी एक फोटो शेअर करत ट्विट केले आहे.

https://twitter.com/one_by_two/status/1424397067951116293?s=20

अतुल खत्री यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर त्यांच्या टीशर्टवर कोविड-19 वॅक्सिनेशन सर्टिफिकेट प्रिंट असल्याचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ट्विट केलं आहे की, ‘काम आणि प्रवास आता पुन्हा सुरू झाला आहे. विमानतळावर, हॉटेल इत्यादी ठिकाणी कोरोना वॅक्सिनेशन सर्टिफिकेट दाखवून कंटाळा आल्याने ही कल्पना सुचल्याचं’ त्यांनी म्हंटल आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!