चेन्नई : आगामी विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूमध्ये ‘एआयडीएमके’, ‘भाजप’ आणि ‘आरपीआय’ महायुतीचे सरकार निवडून येईल, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज चेन्नईत रिपाइंच्या राज्यव्यापी जण जागरण रॅलीचे उदघाटन रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. रिपाइंची ही जण जागरण रॅली सलग १८ दिवस संपूर्ण तामिळनाडू राज्यात फिरणार आहे. रिपाइंचे तामिळनाडू प्रदेश अध्यक्ष फादर सुसाई यांच्या नेतृत्वात ही जनजागरण रॅली तामिळनाडू मध्ये फिरणार आहे.
यावेळी आठवले म्हणाले की, ‘तामिळनाडूतील गरीब भूमिहीनांना ५ एकर जमीन द्यावी, बेरोजगारांना रोजगार द्यावा, तरुणांना स्वयंरोजगारासाठी शासनाने अर्थसहाय्य द्यावे, झोपडी धारकांना पक्के घर देण्यात यावे आदी मागण्याबाबत रिपाइं तर्फे राज्यव्यापी रॅली द्वारे जनजागरण करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्या प्रमाणे सन २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना तामिळनाडूत राबवुन बेघर लोकांना घर देण्यात यावे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत देशात कोट्यावधी लोक अनुदान प्राप्त करीत आहेत. लाखो लोकांना घर मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.
केंद्र सरकार विविध योजनांद्वारे जन कल्याणासाठी कार्यरत आहे असे, सांगत तामिळनाडूत दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या नेतृत्वातील एआयडीएमके, भाजप आणि आरपीआयची महायुती झाली असून ही युती आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चित विजयी होऊन सरकार स्थापन करेल’, असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबाद शहराची निवडणूक ‘ऐतिहासिक’ करण्याचा भाजपचा प्रयत्न
- ‘यांच्या जागी तुमची मुले असती तर काय केले असते?’ जितेंद्र आव्हाडांचा सवाल
- चंद्रकांत पाटलांनी घेतलेल्या ‘त्या’ निर्णयावर बीडचे राजकीय भवितव्य अवलंबून!
- दारू विकणाऱ्यानेच दिली दारू विक्रीची तक्रार, मग काय? खाल्ला मार!
- याजसाठी केला होता अट्टाहास, पण शेवट वाईट झाला! चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश निष्फळ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

