मुंबई : राज्यात कोरोना रोगाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. तर, काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन देखील लागू करण्यात येत आहे. देशातील टॉप-१० ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या जिल्ह्यांमध्ये राज्यातील आठ जिल्ह्यांचा समावेश असल्याने राज्यातील धोका झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.
यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन बाबत एक ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, मागील लॉकडाऊन हे आरोग्य विभागाच्या व्यवस्था सक्षमपणे उभ्या करण्यासाठी लागू करण्यात आलं होतं. आता मृताचं प्रमाण कमी करून या आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यात याव्यात, असं देखील ते म्हणाले आहेत.
‘उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात,’ असा सल्ला देखील महिंद्रा यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
The problem, @OfficeofUT ji, is that the people a lockdown hurts most are the poor, migrant workers & small businesses. The original lockdowns were essentially to buy time to build up hospital/health infrastructure. Let’s focus on resurrecting that & on avoiding mortality. https://t.co/sRoWonrJEp
— anand mahindra (@anandmahindra) March 29, 2021
दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने संपूर्ण राज्यात कोणते कडक निर्बंध लागणार याबाबत काहीशी भीती जनतेमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेला संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी आनंद महिंद्रा यांना नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आहे.
‘एक उद्योजक म्हणाले लॉकडाऊन करण्या ऐवजी आरोग्य यंत्रणा वाढवाव्यात. गेल्या वर्षभरात आपण आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात वाढवली असून अजूनही ती वाढवत आहोत. असे सल्ले देणाऱ्यांना मी हात जोडून सांगू इच्छितो, मी आरोग्य व्यवस्था व बेड्स वाढवतो पण मला रोज किमान ५० डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांचा महाराष्ट्रभर पुरवठा होईल अशी काहीतरी सोय करा. फक्त फर्निचरचे दुकान म्हणजे आरोग्य सुविधा नाहीयेत. त्यामध्ये अनेक तज्ञमंडळी लागतात. ते कुठून आणायचे, त्यामुळे ते पुरवण्याचा मी आवाहन करतो.’ असं भाष्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- नद्यांचा श्वास कोंडलाय; अखेर अजित पवारांनी दिल्या जलपर्णी हटवण्याच्या सूचना
- ‘मास्क न वापरण्यात कसलं शौर्य आलंय?’ मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला
- ‘ “आधारवड” पवारांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम, तरीही त्यांची देशासह राज्यातील घडामोडींवर बारीक नजर’
- किमान मी केलेली विनंती तरी ऐका; मुख्यमंत्र्यांच्या सर्वपक्षीय नेत्यांना कानपिचक्या
- पवार-शाह भेट महाराष्ट्राच्या हिताचीच – नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

