Share

किमान मी केलेली विनंती तरी ऐका; मुख्यमंत्र्यांच्या सर्वपक्षीय नेत्यांना कानपिचक्या

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोना रोगाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. तर, काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन देखील लागू करण्यात येत आहे. देशातील टॉप-१० ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या जिल्ह्यांमध्ये राज्यातील आठ जिल्ह्यांचा समावेश असल्याने राज्यातील धोका झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.

यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शुक्रवारी याबाबत मंत्रिमंडळ बैठक देखील झाली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातील मंत्र्यांनी संपूर्ण लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊन न लावता कडक निर्बधांची अंमलबजावणी करावी अशी मागणी मंत्र्यांनी केली आहे. तसेच, भाजप व मनसेने देखील लॉकडाऊनला तीव्र विरोध केला आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने संपूर्ण राज्यात कोणते कडक निर्बंध लागणार याबाबत काहीशी भीती जनतेमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेला संबोधित केले आहे. यावेळी, अमेरिका, ब्राझील यासारख्या देशांचे उदाहरण दिले आहे.

‘अमेरिकेने सात कलमी कार्यक्रम जाहीर केले आहे. यात राजकारण नको जीव महत्वाचा आहे, असं आवाहन करण्यात आले आहे. आपल्याकडे सुद्धा सर्वपक्षीयांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेले आवाहन नाही पण निदान मी केलेली विनंती मानायला हरकत नाही. जीवाशी खेळ नको, यात राजकारण आणू नका,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!