🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: पश्चिम महाराष्ट्रत पावसाने कहर माजवला आहे, त्यामुळे कोल्हापूर, सांगली व कराडमध्ये महापूर आला असून हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पूरग्रस्त भागाचा आढाव घेतला. आता येत्या एक-दोन दिवसात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे दोघेही पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा याठिकाणी अनेक गावं पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. जवळपास लाखाच्यावर लोकांना प्रशासनाकडून सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. तर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कर, नौदल, एअरफोर्स आणि एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे.
राज्यामध्ये पूरस्थिती असताना सत्ताधारी राजकीय प्रचारात गुंतल्याची टीका विरोधी पक्षाकडून केली जात आहे. आता भाजप व शिवसेनेकडून राज्यात काढण्यात आलेल्या यात्रा स्थगित करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील शिवस्वराज्य यात्रा तूर्तास स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
सांगलीत बचावकार्याची बोट उलटून १० – १२ जणांचा मृत्यू
सांगली जिल्ह्यातील ब्राम्हणाळ गावामध्ये आलेल्या महापुरात बचावकार्य करणारी बोट उलटून १० – १२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. पलूस तालुक्यात असणाऱ्या ब्राम्हणाळ गावामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना घेऊन जाणारी बोट पाण्याचा प्रवाह वाढल्याने अचानक उलटली, यामध्ये ३० च्या आसपास नागरिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बोटमध्ये असणाऱ्या इतर लोकांचा शोध घेतला जात आहे.
पूरग्रस्तांना मदतीची गरज, विमानातून घिरट्या घालून काही होणार नाही – आंबेडकर
‘धनंजय मुंडेंचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा’
चिंता करू नका, शासन नुकसान भरपाई देणार ; मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्तांना दिलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
