Share

मुख्यमंत्र्यांनी साधला चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी संवाद

Published On: 

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्यातील जीम मालकांची बैठक बोलावली होती. त्यानंतर आज कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला. यामध्ये राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि लॉकडाऊनबाबत चर्चा केली आहे. तर यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासन घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सहकार्य करावे, असे आवाहन केले.

या आवाहनाला निर्मात्यांनी देखील आपल्या विविध सूचना मांडून एकजुटीने शासन घेईल त्या निर्णयांना पाठिंबा असेल असे निर्विवाद आश्वासन दिले. या बैठकीमध्ये महेश भट, सुषमा शिरोमणी, मेघराज राजेभोसले, मनोज जोशी, जमनादास सुबोध भावे, डॉ. अमोल कोल्हे, सिद्धार्थ रॉय कपूर, अमित बहेल, निखिल साने, दीपक राजाध्यक्ष, अजय भाळवणकर, टी पी अग्रवाल, सतीश राजवाडे, संग्राम शिर्के, अशोक दुबे, नितीन वैद्य, अशोक पंडित, अभिषेक रेगे, दीपक धर आदींची उपास्थिती होती. त्याचबरोबर आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास आदी देखील सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!