मुंबई : गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस चांगल्याच चर्चेत आहेत. अमृता फडणवीस या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सतत टीका करत आहेत. अमृता फडणवीस सध्या ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनवर लागोपाठ टीका करताना दिसत आहेत. नुकतेच अमृता फडवीस यांनी आणखी एक ट्विट केले आहे.
जगभरात आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस साजरा केला जात आहे. पुरूष दिवसाचं निमित्त साधत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “नॉटी पुरूषांच्या आचार विचाराची घाण घालवून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करा,” असं आव्हान करत अमृता यांनी राऊत यांना नामोल्लेख टाळत टोला लगावला आहे.
आज #InternationalMensDay2020 और #WorldToiletDay2020 पर सभी देशभक्त पुरुषों को, एक आम औरत की ओर से निवेदन करती हूँ की आप सब एक होकर, बुरी सोच वाले कुछ नाममात्र ‘naughty’ मर्दो के आचार-विचार की गंदगी फ्लश करके महाराष्ट्र को स्वच्छ रखने में मदत करे! #toiletday #InternationalMensDay
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 19, 2020
मध्यंतरी अभेनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमध्ये वादंग निर्माण झाले असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाला अपशब्द वापरल्याची टीका होत होती मात्र संजय राऊत यांनी आपण कंगनाला ‘नॉटी गर्ल म्हणाल्याचे सांगत त्यांनी हरामखोर या शब्दाचा अर्थ सांगितला. यावरून आता अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांना ट्विटरच्या माध्यमांतून टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांची मर्जी राखण्यासाठी बावनकुळे यांची सरकारवर टीका : राष्ट्रवादी
- भगव्याचं पेटंट शिवसेनेला दिलंय का? दरेकरांचा संजय राऊतांना टोला
- कॉंग्रेसमध्येही सुरु झाली जेष्ठ नेत्यांची हेटाळणी; सिब्बलांना चौधरींनी दिला पक्ष सोडण्याचा सल्ला
- शेवटी पुंगी वाजवल्या शिवाय शाबासकी कशी मिळणार बरं ?
- शिक्षणाला वयाची अट नसते ! ५६ व्या वर्षी एकनाथ शिंदेंचं पदवी परीक्षेत घवघवीत यश…


