मुंबई : टाळेबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी महावितरणने वीज बिल वसुलीबाबत आदेश काढले होते, त्यावर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे.
राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. ६९ टक्के वीज बिल वसुली पूर्ण झाली आहे, आता सवलतीचा विषय बंद झाला आहे. महावितरण ६९ हजार कोटीच्या तोट्यात आहे, आम्ही आता कर्ज काढू शकत नाही. महावितरणला आता वीज बिल वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत असं देखील राऊत म्हणाले आहेत.
सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर भाजप,मनसे,संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी आक्रमक झालेले दिसत आहेत तर सत्ताधारी मात्र बेताल वक्तव्य करत आहेत.आमदार अमोल मिटकरी यांनी जनतेला आश्वस्थ करण्याएवजी भाजपवर टीका करून या प्रश्नावरून लक्ष हटविण्याचा प्रयत्न केला आहे.
मविआ सरकारला बदनाम करणारी एकएक प्यादी आता जनतेसमोर हळूहळू उघडी होत आहेत. कंगना, सुशांतसिंग, मंदिर आंदोलन, साधु हत्येचं राजकारण व आता विजबील ! विरोधासाठी विरोध करणारे हे महाभाग प्रत्येक वेळी तोंडावर आपटलेत. शेवटी पुंगी वाजवल्या शिवाय शाबासकी कशी मिळणार बरं ?@TV9Marathi
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 19, 2020
आपल्या ट्वीटमध्ये मिटकरी म्हणतात, मविआ सरकारला बदनाम करणारी एकएक प्यादी आता जनतेसमोर हळूहळू उघडी होत आहेत. कंगना, सुशांतसिंग, मंदिर आंदोलन, साधु हत्येचं राजकारण व आता विजबील ! विरोधासाठी विरोध करणारे हे महाभाग प्रत्येक वेळी तोंडावर आपटलेत. शेवटी पुंगी वाजवल्या शिवाय शाबासकी कशी मिळणार बरं ? असा सवाल विचारात मिटकरी यांनी भाजपवर टीका केली आहे.
विशेष म्हणजे वीजबिलाच्या मुद्द्यामुळे सवर्सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल मिटकरी यांनी अद्याप चकार शब्द देखील काढलेला नाही. खरतर सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून मिटकरी यांनी वाढीव वीजबिलाच्या मुद्द्याकडे संवेदनशीलपणे अपेक्षित आहे मात्र या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीला खरच या प्रश्नाचे गांभीर्य आहे कि नाही असा सवाल उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांची मर्जी राखण्यासाठी बावनकुळे यांची सरकारवर टीका : राष्ट्रवादी
- भगव्याचं पेटंट शिवसेनेला दिलंय का? दरेकरांचा संजय राऊतांना टोला
- कॉंग्रेसमध्येही सुरु झाली जेष्ठ नेत्यांची हेटाळणी; सिब्बलांना चौधरींनी दिला पक्ष सोडण्याचा सल्ला
- वीज बिलावर सामन्यांना दिलासा? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक
- शिक्षणाला वयाची अट नसते ! ५६ व्या वर्षी एकनाथ शिंदेंचं पदवी परीक्षेत घवघवीत यश…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

