Share

भगव्याचं पेटंट शिवसेनेला दिलंय का? दरेकरांचा संजय राऊतांना टोला

Published On: 

मुंबई : मुंबई भाजपच्या विद्यमान कार्यकारिणीच्या कार्यकाळातच मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल, असा विश्वास व्यक्त करत भ्रष्टाचाराचे आगार असलेली मुंबई महापालिकेची सत्ता २०२२ मध्ये उलथवून लावायची, असे निर्देश भाजपाचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या माध्यमातून फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने बिहारनंतर आता ‘मिशन मुंबई’ सुरू केले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर टीका केल्यानंतर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केला आहे. ‘भाजपने मिशन, कमिशन काहीही सुरु करावं. त्यांना बीएमसीमध्ये इंटरेस्ट आहे कारण त्यांना मुंबईमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना मुंबईच्या जमीनीत उत्सुकता आहे, मुंबईच्या आर्थिक उलाढालीत, शेअर बाजारात इंटरेस्ट आहे . हे गेले पन्नास वर्षे सुरु असून त्यांना मुंबईला दिल्लीची गुलाम-पायपुसणं करायचं आहे आणि आम्ही ते होऊ देत नाही याचं त्यांना दुःख आहे,’ असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

यासोबतच, ‘भाजपला मुंबई विकायची आहे, घशात घालायची आहे. पण आमचं म्हणणं आहे की, मुंबई श्रमिकांची, मराठी माणसांची, कष्ट मजुरांची आहे मात्र उद्योगपतींची नाही. त्यांना जर मुंबई ओरबाडायची असेल तर आमचा विरोध आहे.’ तसेच, ‘शंभर पिढ्या जरी खाली उतरल्या तरी मुंबई पालिकेवर जो भगवा फडकतोय, तो उतरवायचं सोडाचं हात लावण्याची देखील हिम्मत नाही. तुमचे हात जाळून खाक होतील. एवढी आग त्या भगव्यामध्ये आहे,’ असं देखील त्यांनी भाजपला ठणकावलं आहे.

शिवसेनेने केलेल्या या टीकेवर भाजपने पलटवार केला आहे. मुंबईकर ठरवतील सत्तेचा झेंडा कोणाकडे द्यायचे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर आमचाच भगवा असेल. भगव्याचं पेटंट शिवसेनेला दिलंय का? असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत यांची बॉडी लँग्वेज आत्मविश्वास हरवलेली आहे, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी खोचक टीका केली आहे. ‘सामना’ हे काही दिशा देणारं दैनिक नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!