मुंबई : गेल्या दीड वर्षापासुन जगभरात सुरु असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे चित्रपटगृहे ओस पडली होती. मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव हळुहळु ओसरु लागल्याने लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले. मात्र अद्यापही महाराष्ट्र राज्यात चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे उघडण्यास अद्यापही उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही.
यादरम्यान देशातील इतर राज्यात सुरु असलेल्या चित्रपट गृहात अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. त्याच्या या निर्णयाने चित्रपटगृहाच्या मालकांना एक आशेचा किरण दिसला आहे. यामुळे इतर राज्यातही चित्रपटगृहे उघडण्यास प्रोत्साहन मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यापासुन अनेक चित्रपटांचे प्रदर्शन रखडले आहे.
कोरोना काळात जरी चित्रपटगृहे बंद असली तरी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. यामुळे काही चित्रपट डीजीटल ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले आहे. मात्र मोठ्या बॅनरच्या चित्रपट अजुनही रखडलेले आहे. परिणामी जेव्हा चित्रपटगृहे सुरु होतील तेव्हा मात्र अनेक मोठ्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘थग ऑफ हिंदुस्थान’नंतर कटरीना आणि बीग बी पुन्हा एकत्र
- लसींचे दोन डोस घेतले तरी देखील खासदार अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण
- ‘मी त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो पण…’; छत्रपती संभाजीराजेंचा गौप्यस्फोट
- जनआर्शिवाद यात्रा : डॉ. भागवत कराड येण्याआधीच स्थानिक नेत्यांनी भागवली सत्काराची हौस
- ‘संभाजी भोसलेंना अटक करा’; गुणरत्न सदावर्ते यांची स्फोटक मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

