मुंबई : बॉलीवुडची बार्बी डॉल म्हणून प्रसिद्ध असलेली कटरिना कैफ आणि बॉलीवूडचे शहेणशहा बीग बी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक आर बाल्की यांच्या आगामी चित्रपटात हे दोघे एकत्र दिसणार आहे. अद्यापही या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही.
आर बाल्की आणि अमिताब बच्चन यांनी एकत्र अनेक चित्रपटात काम केले आहे. तर कटरिनाने बॉलीवूडमध्ये पदार्पणातच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. यानंतर दोघे सरकार आणि थग ऑफ हिदोंस्थान या चित्रपटात काम केले आहे. आर बाल्की यांच्या चित्रपटातील कथा नेहमीच भावस्पर्शी असते. प्रेक्षकांनी नेहमीच त्यांच्या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे.
अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपती या रियालीटी शो च्या १३व्या पर्वात सुत्रसंचालन करताना दिसतील. तर कटरीना कैफ काही दिवसातच टायगर ३च्या चित्रीकरणासाठी विदेशात रवाना होणार आहे. तर काही दिवसापुर्वी तिने फरहान अख्तरचा ‘जी ले जरा’ हा चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटात कटरिना व्यतिरिक्त प्रियंका चोप्रा आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लसींचे दोन डोस घेतले तरी देखील खासदार अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण
- ‘मी त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो पण…’; छत्रपती संभाजीराजेंचा गौप्यस्फोट
- जनआर्शिवाद यात्रा : डॉ. भागवत कराड येण्याआधीच स्थानिक नेत्यांनी भागवली सत्काराची हौस
- ‘संभाजी भोसलेंना अटक करा’; गुणरत्न सदावर्ते यांची स्फोटक मागणी
- ‘गोमूत्र शिंपडणारे समोर आले असते तेच गोमूत्र कोल्ड्रिंग सारखं घशात घालून पुढे निघालो असतो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

