Share

‘त्या’ डॉक्टरला अटक करा : एमआयएम

Published On: 

औरंगाबाद :  काल शहरातील पदमपूरा येथील कोविड सेंटरमध्ये रात्री एका पॉझिटिव्ह महिला रुग्णावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरवर शक्ती कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्याची मागणी एमआयएमच्या महिला आघाडीकडून शहरातील पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.

महिला रुग्णावर झालेल्या या प्रकाराने खुप वेदना झाल्या आहेत. तसेच माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. महानगरपालिकेच्या वतीने या दोषी डॉक्टरला बडतर्फ केले आहे. पण शक्ती कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्वरित अटक करावी, अशी मागणी एमआयएमच्या महिला विंगच्या प्रदेशाध्यक्ष अँड. आस्मा शेख यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. राज्याचे गृहमंत्री, औरंगाबादचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांच्याकडे आपल्या मागणीचे निवेदन देखील पाठवले आहे.

कोविड सेंटरमध्ये महीलाच सुरक्षित नाही तर, मग महिला रुग्णांनी उपचार घेण्यासाठी कसे पुढे येतील. यासाठी शासनाने योग्य कारवाई करावी. यापुढे अशी घटना होणार नाही, यासाठी कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. त्या नराधम डॉक्टराची सखोल चौकशी करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी पत्रकार परिषदेत अॅड. अस्मा शेख, शेख समीना, शेख आसीया शकील, शेख रेहाना कासीम, शेख सानिया शकील यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!