Share

मुनगंटीवारांची राष्ट्रपती राजवटीची भाषा ही मोदींची राजकीय भूमिका – नाना पटोले

Published On: 

मुंबई : आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस होता. गेले तीन दिवस राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधकांनी राज्य सरकारवर आरोपांची सरबत्ती केल्याचं दिसून आलं. तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज भाजपच्या आरोपांवर भाष्य करत चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

जळगाव येथील एका वसतिगृहात पोलिसांनी काही तरुणींना विवस्त्र होऊन नृत्य करण्याची सक्ती केल्याची तक्रार रत्नमाला सोनार यांनी दिली होती. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार या प्रकरणावरून कमालीचे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणावरून मुनगंटीवारांनी प्रचंड संताप व्यक्त करत थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आल्याचं सांगितल. ‘मी संविधानाला मानणारा आहे. संविधानाचं पालन करणारा आहे. पण राज्यात आमच्या आयाबहिणींची होत असलेली थट्टा पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय नाही,’ असं म्हणत त्यांनी विधानसभेत तीव्र संताप व्यक्त केला होता.

दरम्यान, आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशी अहवालातून समोर आलेली माहिती सादर केली. या वसतीगृहात 17 महिला राहत होत्या. 20 फेब्रुवारी रोजी या वसतीगृहात एक मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गरब्याचा डान्स सुरु होता. तेव्हा त्रास होत असल्यामुळे एका महिलेने अंगातील झगा उतरवून ठेवला. याउपर त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस खात्यातील कोणतीही व्यक्ती तिथे उपस्थित नव्हती. ही तक्रार खोटी असल्याच देखील अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

यानंतर, नाना पटोले यांनी भाजपला लक्ष्य करताना सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीचा देखील समाचार घेतला आहे. ‘राष्ट्रपती राजवट लावण्यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार जी वक्तव्य करत आहेत ती पाहिली असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकीय भूमिका ते मांडत आहेत. भाजपवाल्यांना राज्यपालांच्या मार्फत राज्यात राष्ट्रपती राजवट लावून राज्यातील सरकार अस्थिर करायचं आहे,’ अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!