पैठणः नाथसमाधी मंदीराच्या पाठीमागे गोदावरी तटी भव्य असे मोक्षघाट व्हावे म्हणुन सन २००६ साली नाथमंदीरातत्यांनी उपोषण केले होते. त्या उपोषणाची दखल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी घेतली होती. गोदावरीतटी भव्य मोक्षघाट उभारले. त्याचे जनक हभप बाजीराव महाराज जवळेकर यांनी आखेर वयाच्या ८५ व्यां वर्षी पैठण येथील गीता मंदीरात देह ठेवला.
संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या पैठण येथील भव्य दिव्य गीता मंदिराचे जवळेकर महाराज हे निर्माते होते, वारकरी सांप्रदायातील ते मोठे प्रस्थ होते, ज्यांना गोदावरी भुषण पुरस्काराने सन्मानीत केले गेले होते, बाजीराव महाराजांनीच सर्वप्रथम पैठण नगरीमध्ये गोरगरिबांसाठी मोफत अन्नछञ् सुरु केले असुन ते आजतागायत चालू आहे, त्याच बरोबर जवळेकर महाराज आर्धांगवायु,अस्थमा आदी रोगांवर रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषधी देत असत, तसेच जवळेकर महाराजांना समाज भूषण, आयुर्वेदाचार्य या पुरस्कारांनीही सन्मानीत करण्यात आले होते.
आयोध्येत राममंदिर उभारावे म्हणून जवळेकरांनी कोट्यावधी रामनामाचा जप केला होता, असे हरहुन्नरी असलेले जवळेकर महाराजांनी वयाच्या ८५ व्यां वर्षी देवाज्ञा झाली, त्यांच्या अंत्यविधीला महाराष्ट्रातील हजारोच्या संख्येने असलेले त्यांचे शिष्य,हितचिंतक तसेच पंढरपूर, आळंदी, देहू, खानदेश, विदर्भ आदी ठिकाणचे मठाधिपती अंत्यविधीसाठी उपस्थीत होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन असणार केरळमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार
- क्रीडा क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी ‘रिपाइं’ ची आता क्रीडा आघाडी
- राज्यभरात गाजत असलेल्या कोविड सेंटरमधील ‘त्या’ घटनेबाबत महत्त्वाची माहिती आली समोर!
- ‘सत्ताधाऱ्यांना पाच, आम्हाला फक्त एक कोटी! ऐसा कैसा चलेगा?’
- ‘या’ घटनांमुळे शहरात वाढली दबंगाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

