बीड: कोरोना मारामारीच्या काळात जेव्हा कोणीच काम करण्यास तयार नव्हते. तेव्हा आमचे गरिबांचे लेकरा होमिओपॅथी डॉक्टर धावून आले. त्यांनी कसली ही पर्वा न करता रुग्णांला संकटकाळी सेवा देऊन मानवता धर्म निभावला आहे. अशा सर्व डॉक्टरांना कायमचे रुजू करावे अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत बोलताना केली.
मागच्या वर्षी राज्यात कोरोनाचे मोठे संकट ओढवले. या संकटाशी दोन हात करण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत असताना, राज्यातील होमिओपॅथी डॉक्टर पुढे सरसावत त्यांनी रुग्णांला सेवा देण्यास सुरुवात केली. त्यावेळी राज्यातील आरोग्य विभागाच्या जागा भरताना या डॉक्टरांचा विचार केला जाईल असे सांगितल्या गेले होते. मुळात काम झाल्यावर या कोरोना योध्याना घरचा रास्ता दाखवण्यात आला. आणि सध्या शासनाला या योध्यांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे .
पुढे बोलतांना, सरकारने या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर त्यांना न्याय द्यावा. ती गरीबांची पोरं संकटकाळी धावून आली त्याची जाण मायबाप सरकारने ठेवावी. या विषयात लक्ष घालून त्या योध्यांची भरती करून घ्यावीत. त्यांना योग्य ते मानधन दयावे. व त्यांच्या कामाला योग्य ती दाखल घ्यावी.अशी मागणी त्यांनी केली. सरकार या विषयावर लवकरात लवकर लक्ष देईल असा विश्वास त्यांनी दाखवला.
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या सर्व संचालकांना घरी बसवणार : आ. आंबादास दानवे
- राज्यभरात गाजत असलेल्या कोविड सेंटरमधील ‘त्या’ घटनेबाबत महत्त्वाची माहिती आली समोर!
- शुद्धीवर न आलेल्या महिलेची आखेर ओळख पटली; गुढ मात्र कायम
- ‘चिनीसैन्य माघार घेत असल्याचा उत्सव म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेची बनवा
- ‘त्या’ डॉक्टरला अटक करा : एमआयएम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

