Share

‘ख्रिस गेल’ लवकरच संघातून खेळताना दिसेल

Published On: 

🕒 1 min read

दुबई : आयपीएलमध्ये सद्या चुरशीचं वातावरण असतानाच अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे तर काहींना वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल अर्ध्यात सोडून घरी परतावं लागलं होतं. आता गोलंदाजांचे धाबे दणाणून सोडणारा वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेल बद्दल धक्कादायक बाब समोर आली होती. यंदाच्या मोसमात ख्रिस गेल किंग्ज इलेव्हन पंजाब संघात आहे. मात्र ७ सामने होऊन देखील ख्रिस गेलला खेळवण्यात आलेलं नाही.

पंजाबने आतापर्यंत ७ पैकी ६ सामने गमावले असून चाहते ख्रिस गेलच्या आगमनाची वाट पाहत आहेत. ख्रिस गेलला संघात का संधी मिळत नाही आहे, याचे कारण समोर आले आहे. गेलला अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी गेलला फूड पॉयझन झाल्याचे सांगितले होते. आता गेलनं स्वत: हॉस्पिटलमधला एक फोटो शेअर केला होता.

आयपीएलमधील सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा ख्रिस गेल आता तंदुरुस्त झाला आहे. पंजाबचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी ही माहिती दिली असून, गेल लवकरच संघातून खेळताना दिसेल,रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध होणाऱ्या सामन्यातून गेल पंजाबकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल आता पूर्णपणे फिट झाला असून आरसीबीविरुद्ध त्याचे खेळणे जवळपास निश्चित आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!