🕒 1 min read
पुणे : भाजपचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवत, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. पुण्यात कोव्हीड सेंटर मध्ये भ्रष्टाचार झाला असून तो उघड करणार असे किरीट सोमय्या काल पत्रकार परिषदेत म्हणाले होते तसेच आज पुण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवणार होते.
पुण्यात किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत गाडी अडविन्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी त्यांना धक्का – बुक्की सुद्धा करण्यात आली. एका ठिकाणी गोंधळात सोमय्या दादरवर पडले देखील. त्यांना तत्काल संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत, राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? असा सवाल सरकारला केला आहे. आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून शिवसेना थेट गुंडगर्दी करत आहे. आम्ही कायदा पळतो पण याचा अर्थ थेट गुंडगर्दी खपवून घेतली जाणार नाही. महाराष्ट्रत सातत्याने लोकशाहीचा मुडदा पडू नका असा इशाराही त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेच्या नेत्यांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या ट्रेलरवर महेश भट्टची प्रतिक्रिया
- “विद्यापीठ कायद्यात करण्यात आलेले बदल मागे घ्या, अन्यथा…”; अभाविपचा इशारा
- “हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र…”; खासदार इम्तियाज जलील यांची महाराष्ट्र सरकारला आठवण
- “रुको जरा…,सबर करो”; हिंदुस्तानी भाऊ अजून १४ दिवस न्यायालयीन कोठडीत
- “पायाखालची वाळू घसरली की…”; सोमय्यांना शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
