पुणे: २०२० मार्च महिन्यात पुण्यात कोरोना विषाणूने बाधित झालेला पहिला रुग्ण सापडला. सामाजिक अंतर आणि कोरोना विषाणूची धास्ती यामुळे पुणे शहरातील अनेक व्यवहार जागीच ठप्प झाले. शिक्षण ,उद्योग, क्रीडा, कला अश्या अनेक क्षेत्रांना कोरोनामुळे अडथळा निर्माण झाला. परंतु कोरोना विषाणू प्रतिबंधक लसींच्या मात्रा द्यायचे प्रमाण जसे जसे वाढत गेले तस तशी कोरोनाची पुणे शहरातील तीव्रता कमी होत गेली. कोरोनाची शहरातील स्थिती नियंत्रणात आल्यावर शहरातील अनेक व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू करण्यास राज्य आणि जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.
क्रीडा क्षेत्रा संबंधी असेच आदेश पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काढले आहेत. शासनाच्या कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार विविध क्रीडा स्पर्धांना 25 टक्के प्रेक्षक उपस्थितीत परवानगी देण्यात यावी असे स्पष्ट निदेश पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेलया कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी आज या संबंधी स्पष्ट निर्देश दिले आहेत.
पुणे शहरात आणि एकूणच जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसी द्यायचे प्रमाण जास्त असल्याने, या स्पर्धा २५ टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत भरवण्यास पालकमंत्री अजित पवार यांनी परवानगी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “विद्यापीठ कायद्यात करण्यात आलेले बदल मागे घ्या, अन्यथा…”; अभाविपचा इशारा
- “हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र…”; खासदार इम्तियाज जलील यांची महाराष्ट्र सरकारला आठवण
- ‘रुको जरा’, अजून १४ दिवस न्यायालयीन कोठडीत, ‘सबर करो’
- राज ठाकरे लता दीदींच्या भेटीला
- ठरलं तर…! ‘हा’ खेळाडू करणार रोहित शर्मा बरोबर सलामी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
