Share

“मविआ सरकारच्या नेत्यांनी मारलेल्या थापांच्या भुलभुलैयात फसलेल्या…”, चित्रा वाघ यांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठवाड्यात शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र कायम असून मागील तीन महिन्यांमध्ये २३३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ७१ आत्महत्या बीड जिल्ह्यातील आहेत. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,‘मराठवाड्यात गेल्या ३ महिन्यात २३३ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याच्या हेक्टरी ५० हजार मदतीच्या मोफत विजेच्या मारलेल्या थापांच्या भुलभुलैयात फसलेल्या बळीराजाची ही शोकांतिका आहे.ठाकरे सरकारचा निषेध’, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

दरम्यान, २०२० मध्ये ७७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तसेच २०२१ या वर्षात मराठवाड्यातील ८८७ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आत्महत्या केली होती. त्यात २०२२ च्या तीन महिन्यांमध्येच २३३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचे समोर आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!