मुंबई: १९९२ च्या दंगलीत शिवसैनिकांनी बलिदान दिले. अयोध्यामध्ये शिवसेनेचा त्याग ते विसरले. मात्र आम्हाला हिंदुत्व भाड्याने घ्यावे लागत नाही ते आमच्या रक्तामध्ये आहे. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर केली. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते. यावरच भाजप नेते राम सातपुते (Ram Satpute) यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.
“आम्हाला हिंदुत्व भाड्याने घ्यावे लागत नाही इति खा.संजय राऊत. मात्र सध्या अख्खा शिवसेना पक्षच राष्ट्रवादीला भाड्याने दिलाय ते पण सांगा की…”, असा टोला राम सातपुते यांनी ट्वीट करत लगावला आहे.
आम्हाला हिंदुत्व भाड्याने घ्यावे लागत नाही
– खा.संजय राऊत
सध्या अख्खा शिवसेना पक्षच राष्ट्रवादी ला भाड्याने दिलाय ते पण सांगा की .@rautsanjay61 @Dev_Fadnavis @OfficeofUT— Ram Satpute (@RamVSatpute) April 30, 2022
नेमके काय म्हणाले संजय राऊत?
धर्माच्या आणि जातीच्या नावाने नाव खराब करण्याचे काम काही जण करत आहे. खासकरून महाराष्ट्राची बदनामी काही असामाजिक संघटना करत आहेत. त्यांना उत्तर आणि सामोरे जाणार. शिवसेना छातीवर वार झेलणार पक्ष आहे. पाठीमागून वार आमच्यात चालत नाही. आतापर्यंत आम्ही सत्ता आणि सरकार असल्याने संयम बाळगला पण पाणी डोक्यावरून जात असेल तर त्या पाण्यामध्ये आम्हला इतरांना बुडवावे लागेल. आम्हाला लढण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज नाही. तसेच आम्हाला भाडोत्री लोक देखील लागत नाही लढण्यासाठी. आम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन लढत नाही. आमची हत्यारे आमचीच आहे. असे संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला ठेच पोहचत असेल..” ; केंद्रीय मंत्र्यांची शिवसेनेवर टीका
- VIDEO : इंग्लंडमध्ये चेतेश्वर पुजाराचा धुमाकूळ..! साजरी केली ‘हॅट्ट्रिक’; पाहा!
- IPL 2022 RR vs MI : फक्त तुझ्यासाठी शेन वॉर्न..! आज राजस्थान रॉयल्स करणार ‘ही’ गोष्ट; मुंबईचे खेळाडूही पाहत राहणार!
- “सभेच्या दिवशी माझ्या हाता-पायांना घाम फुटतो…”; राज ठाकरेंचं वक्तव्य
- “त्यांच्या गुळगुळित मेंदुवर सुरकुत्या पडून…”, चित्रा वाघ यांच्या टीकेवर शिवसेनेचे प्रत्युत्तर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

