मुंबई: भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे भाजप नेते संतप्त झाले आहेत. प्रवीण दरेकर यानं देखील ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली असल्याचे मत व्यक्त केले होते. त्याच सोबत त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील निशाणा साधला होता. त्याच सोबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
लोकप्रतिनिधीची वागणूक कशी नसावी याचा नमुना संजय राऊतांनी घालून दिलाय, अशा शब्दांत चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्याची पोलिस यंत्रणा सरकारच्या दावणीला बांधली गेल्याप्रमाणे काम करतीये. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. जे वाक्य बोललं गेलच नाही ते शद्ब भाजप नेते आशिष शेलार यांच्या तोंडी देण्याचा प्रयत्न करत खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोप देखील चित्रा वाघ यांनी केला आहे.
लोकप्रतिनिधीची वागणूक कशी नसावी याचा नमुना संजय राऊतांनी घालून दिलाय
सर्व चॅनेलवर LIVE प्रक्षेपण झालेली त्यांची पत्रकार परिषद पुरावा मानून शिवीगाळ केल्या प्रकरणी संजय राऊत जी यांच्यावर कारवाई करावी(२/२) @CMOMaharashtra @maharashtra_hmo @MumbaiPolice @DGPMaharashtra @Dev_Fadnavis
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 9, 2021
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत शिवीगाळ केली असल्याचा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) त्याच सोबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. या प्रकरणी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, लोकप्रतिनिधीची वागणूक कशी नसावी याचा नमुना संजय राऊतांनी घालून दिलाय सर्व चॅनेलवर लाईव्ह प्रक्षेपण झालेली त्यांची पत्रकार परिषद पुरावा मानून शिवीगाळ केल्या प्रकरणी संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- निवडणूकांचे वातावरण; सोयगावात १७ जागांसाठी ९० उमेदवारी अर्ज दाखल!
- भीमा कोरेगाव प्रकरणातील सुधा भारद्वाज यांना ‘या’ शर्तींसह जामीन मंजूर
- तुमचे कू कृत्य जनतेसमोर उघडे करू – आशिष शेलार
- अंकिता लोखंडेच्या लग्नास विलंब? ; लग्नापूर्वी दिली दु:खद बातमी
- ‘महाराष्ट्रातील ओबीसींवरच असा अन्याय का?’


