Share

भीमा कोरेगाव प्रकरणातील सुधा भारद्वाज यांना ‘या’ शर्तींसह जामीन मंजूर

Published On: 

मुंबई: भीमा-कोरेगांव प्रकरणी (Bhima Koregaon Case) गेल्या तीन वर्षांपासून तुरुंगात असणाऱ्या वकील आणि कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (Sudha Bharadwaj) यांची आज गुरुवारी भायखळा तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. एल्गार परिषद-नक्षलवाद्यांच्या संबंधाप्रकरणी सुधा भारद्वाज यांना मुंबई हायकोर्टाने जामीन दिला आहे. त्याच सोबत एनआयए (NIA) कोर्टाकडून देखील सुटका करण्यात आली आहे.

२०१८ साली झालेल्या भीमा कोरगाव हिंसा प्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी एक सुधा भारद्वाज या होत्या. त्यांना जामीन मंजूर झाला होता. मात्र, जामीनाच्या शर्ती निश्चित झाल्या नव्हत्या. हायकोर्टाने जामीनाच्या शर्ती निश्चित करण्यासाठी ८ डिसेंबर रोजी सुधा भारद्वाज यांना एनआयएच्या स्पेशल कोर्टामध्ये हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता सुधा भारद्वाज यांना शर्तींसह जामीन देण्यात आला आहे.

सुधा भारद्वाज यांची सुटका करताना कोर्टाने त्यांच्यावर काही शर्ती लादल्या आहेत. यामध्ये विना परवानगी मुंबईच्या बाहेर न जाणे तसेच पासपोर्ट जमा करण्याचे आदेश आहेत. याशिवाय स्पेशल कोर्टाने त्यांना UAPA अंतर्गत दाखल केल्या गेलेल्या FIR प्रमाणे बेकायदेशीर बाबींमध्ये पुन्हा न गुंतण्याची ताकीद देखील दिली आहे. या शर्ती व अटींवर सुधा भारद्वाज यांना जमीन देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!