Share

निवडणूकांचे वातावरण; सोयगावात १७ जागांसाठी ९० उमेदवारी अर्ज दाखल!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबादः सोयगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीकरीता शेवटच्या दिवशी तब्बल ५८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता १७ जागांसाठी ९० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक अधिकारी संजीव मोरे यांनी दिली. १३ डिसेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

नगर पंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज स्वीकृतीसाठी दुपारी तीनऐवजी दोन तास कालावधी वाढवून पाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वाढवून दिला. दुपारी दोन वाजेपासूनच ऑनलाइन अर्जासाठीचे संकेतस्थळ बंद करण्यात आल्याने दिलेल्या कालावधीचा इच्छुकांना उपयोग झाला नाही. त्यामुळे ऐनवेळी इच्छुकांची निराशा झाली. प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये शिवसेना-१७, भाजपा- १७, प्रहार- १, काँग्रेस- १३, राष्ट्रवादी-८ आणि वंचित बहुजन आघाडी-२ याप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

फुलंब्री येथील नगरपंचायतीच्या दोन जागांसाठी २१ डिसेंबर रोजी पोट निवडणूक होत आहे. यासाठी १५ जणांनी १६ उमेदवारी अर्ज भरले आहेत. फुलंब्री नगरपंचायतीतील दोन नगरसेवकांविरोधातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यांच्यासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. तर सिल्लोड नगर परिषदेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!