मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर आले होते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तोक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते हे देखील कोकणामधील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून आढावा घेत आहेत. तर, कोकणाला मदत देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल असं स्पष्ट केलं. मात्र, केवळ ३ तासात आटोपता घेतल्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
आज आणखी एक वादळ कोकणात येऊन गेलं…
वादळाच्या 3 ते 4 दिवस आधी प्रशासन तयारी करते तशी तयारी झाली होती
पण आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली
किंबहुना
या वादळामुळे कोकणात इतकी पानं पडली की आता लोकांच्या तोंडाला पुसायला पण पानं शिल्लक राहिली नाहीत…..— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 21, 2021
आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे. ‘आज आणखी एक वादळ कोकणात येऊन गेलं… वादळाच्या 3 ते 4 दिवस आधी प्रशासन तयारी करते तशी तयारी झाली होती पण आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली किंबहुना या वादळामुळे कोकणात इतकी पानं पडली की आता लोकांच्या तोंडाला पुसायला पण पानं शिल्लक राहिली नाहीत…,’ असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- १ जूननंतर राज्यातील लॉकडाऊन वाढणार ? अजित पवार म्हणाले…
- ‘पवारांना त्या उपसमितीचे प्रमुख करणं म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करण्यासारखं’
- संभाजीराजेंचा असा अवतार मी पाहिला नाही, मोदींनी भेट न दिल्यामुळेच त्यांचा संताप – मुश्रीफ
- ‘मलिकांनी आमचे बुट पाहण्यापेक्षा कोकणात जावे, जनता त्यांना कोल्हापूरी चप्पल दाखवतील’
- पीएम केअरच्या बंद व्हेंटिलेटर्सला चालू म्हणून दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव? -आ. सतिश चव्हाण


