Share

‘मलिकांनी आमचे बुट पाहण्यापेक्षा कोकणात जावे, जनता त्यांना कोल्हापूरी चप्पल दाखवतील’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे.

तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी 3 दिवस पाहणी दौरा केला आहे. या दौर्यावर्ती राज्याचे अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीस आणि दरेकर यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते कि, ‘विरोधकांना दौरा करायचा ते त्यांच्या पद्धतीने करत आहेत. पंचनाम्याच्या आधारावर मदत जाहीर होते. किती किलोमीटर गेले, पायी किती गेले, किती दौरे केले हे आम्ही विरोधकांना विचारत नाही. विरोधक फिरत असताना दोघांचे एकसारखेच होते. बूट एकसारखे घालतात, बूट खरेदी करतात, बूट नवे खरेदी करावे लागतात. यांचे बूट Nikeचे की Pumaaचे हे ठाऊक नाही पण नटून जात आहे. मुंख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही,’ अशा शब्दात नवाब मलिक यांनी फडणवीस आणि दरेकर यांच्यावर टीका केली होती.

नवाब मलिक यांच्या या टीकेवर आता प्रवीण दरेकर यांनी प्रतिउत्तर दिले आहे. नवाब मलिक टीका करतात आणि विरोधी पक्षाच्या कोकणातील पाहणी दौऱ्यावर टीका करतात. मलिक आमच्या बुटांबाबत बोलतात. आम्ही बुट घातले की सुट घातले, हे नवाब मलिक बोलतात. आम्ही पाहणी करायची आणी यांनी घरात बसायचं. यापेक्षा लोकशाहीची थट्टा असू शकत नाही. नवाब मलिकांनी आमचे बुट पाहण्यापेक्षा कोकणात जा. कोकणची जनता तुम्हाला कोल्हापूरी चप्पल दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढा संताप कोकणच्या जनतेच्या मनात आपल्याविषयी झाल्याचं दिसत आहे, अशा शब्दात दरेकर यांनी नवाब मलिकांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!