कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला खासदार संभीजीराजे छत्रपती यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहेत. यातच आता खा. संभाजीराजे छत्रपती यांनी काल आपली बेधडक भूमिका मांडली. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले, त्यावर त्यांची भूमिक काय आहे, याकडे सर्वांच लक्ष होतं. त्यावरच त्यांनी काल नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका मांडली.
मराठा आरक्षणासंदर्भात भाजपने त्यांची भूमिका घ्यावी. मी काही त्यांचा ठेका घेतलेला नाही. भाजपने मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, यावर तोडगा सांगावा, असंही संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजे म्हणाले की, ‘मी शांत आहे, ही महाराजांची शिकवण आहे. मी आक्रमक होणार याआधी मार्ग काय काढणार, हे सांगा असे ते म्हणाले.
संभाजीराजेंच्या या रौद्रावतारावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाष्य केलं आहे. ‘संभाजीराजेंसारख्या संयमी व्यक्तीचा असा अवतार मी पाहिलेला नाही. चार वेळा पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटायला वेळ देत नाहीत. याबद्दल त्यांचा संताप आहे. सत्तारूढ लोक मराठा आरक्षणाला दिलासा देत नाहीत अशी त्यांची मागणी आहे. पण संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालीच हा लढा यशस्वी होईल. मराठा आरक्षणासाठी जे काही प्रयत्न करता येतील, ते आम्ही करू आणि संभाजीराजांचं समाधान करू,’ असा विश्वास देखील हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
- १ जूननंतर राज्यातील लॉकडाऊन वाढणार ? अजित पवार म्हणाले…
- ‘पवारांना त्या उपसमितीचे प्रमुख करणं म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करण्यासारखं’
- तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवा – अजित पवार
- अतुल भातखळकरांना लाज वाटली पाहिजे; हसन मुश्रीफांनी झापलं !
- राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना एक फोन आणि राज्यात चित्रीकरणाला तत्त्वत: मान्यता जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
