Share

chitra wagh : “जे अडीच वर्षात घडत नव्हते ते आता…”, शिंदे सरकारच्या ‘त्या’ घोषणेनंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई: महाराष्ट्राचे नवनिर्वाचत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) हे सध्या ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल-डिझेलबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आज शिंदे सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले कि, देशात मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. देशातील अनेक राज्यांनी दर कपात केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने केली नव्हती. मात्र आपण पेट्रोल पाच आणि डिझेल तीन रुपयांची दर कपात केली असल्याचे शिंदे यांनी म्हटले. या घोषणेचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्या या घोषणेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी कौतुक करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “सर्वसामान्यांना शिंदे-फडणवीस सरकारचा पुन्हा दिलासा. पेट्रोल वर ५ तर डिझेल वर तीन रुपयांची कर कपात,  जे अडीच वर्षात घडत नव्हते ते आता घडतेय. हे तर जनसामान्यांचे सरकार आहे.”, असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.

१८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस मोफत-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठ्या घोषणा केल्या आहेत.  सरकारने पेट्रोलवरील कर कमी करत सर्व सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. यासोबतच कोरोना प्रतीबांधक लस म्हणून राज्यातील १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे एक प्रकारे सर्वांना कोरोना प्रतीबंधक लस मिळावी हा हेतू साकार होईल.

बाजार समितीतील शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार-

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार  (ग्रामविकास विभाग) बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्येही सुधारणा करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!