Share

Eknath Shinde : “बाजार समितीतील शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार”, शिंदे सरकारची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठ्या घोषणा केल्या आहेत. सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच शिंदे सरकारची सर्वांत पहिली मोठी घोषणा म्हणजे राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. सरकारने पेट्रोलवरील कर कमी करत सर्व सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांनतर दुसरी मोठी घोषणा म्हणजे आता नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडला जाणार आहे.

“महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार  (ग्रामविकास विभाग) बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्येही सुधारणा करण्यात आली आहे.

दरम्यान राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार आहे. यासोबतच कोरोना प्रतीबांधक लस म्हणून राज्यातील १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे एक प्रकारे सर्वांना कोरोना प्रतीबंधक लस मिळावी हा हेतू साकार होईल. सध्या राज्यात कोरोना रुग्ण संख्येचा आकडा कमी असून बुस्टर डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही अधिक असल्याचे दिसून येते.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!