Share

Rohit Pawar : “राज्यात ओला दुष्काळ सदृश परिस्थिती”, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

Published On: 

मुंबई: राज्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळं गेल्या काही दिवसात १.३० लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके प्रभावित झाली असून हजारो हेक्टर जमीन पाण्याने खरडली गेलीय तर ९० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. एकंदर राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळं ओला दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालीय. यामुळं जीवित हानी आणि शेतीच्या झालेल्या या नुकसानीकडं नवीन सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी केली आहे.

दरम्यान पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क व समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत.

तसेच राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क व सज्ज आहे. कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत. स्थलांतरितांना भोजनासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यासह धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!