Share

Viral video | नाग व मुंगूसाच्या लढाईचा थरार कॅमेऱ्यात कैद

Published On: 

🕒 1 min read

अकोला: पावसाळा चालू झाला की साप, नाग, बेडूक असे प्राणी रहिवासी भागात यायला लागतात. याच काळात अनेक ठिकाणी मोठमोठाले विषारी साप आढळण्याचे प्रमाणही वाढते. अश्यातच एका कोब्रा जातीचा नाग आणि मुंगूस यांच्यातील झुंज पाहायला मिळाली. बाळापूर तालुक्यातील व्याळा येथील श्रीमती यशोदाबाई इंगळे विद्यालय परिसरात हि घटना घडली. ही अनोखी झुंज पहायला विद्यार्थी, शिक्षक व काही ग्रामस्थ देखील जमले होते. ही सर्व घटना नागरिकांनी आपल्या फोनमध्ये कैद केली आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मुंगूस आणि नाग या दोन्ही प्राण्यांतील शत्रूत्व हे नैसर्गिक आहे. त्यामुळे हे प्राणी समोर आले की त्यांच्यात झुंज ही होतेच. तशीच झुंज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे, कोब्रा जातीचा एक नाग या परिसरात आढळून आला त्यानंतर त्याला तीन मुंगुसानी घेरले. जवळपास अर्धा तास चाललेल्या या लढाईत एकाच मुंगुसाने नागाला जेरीस आणले होते. अखेर या लढाईत मुंगुसाने नागाचा फणा पकडून त्याला ठार केले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!