Share

चिपी विमानतळ उद्घाटन; फडणवीसांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, ‘ही श्रेयवादाची लढाई नाही, पण..’

Published On: 

मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या श्रेयवादावरुन चांगलेच राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत ९ ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार असल्याचे जाहीर केले. या विमानतळाच्या उद्घाटनासोबतच श्रेयवादावरुनही राजकारण गरम झाले आहे.

नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत म्हटले होतं की, मी ज्योतिरादित्य सिंधियांना भेटलो आणि विमानतळ उद्घाटनाचा वेळ घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला बोलावणार का? यावर राणेंनी म्हटलं होतं, ‘मुख्यमंत्री पाहिजेत असं नाही’. राणेंच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेने भाजपवर टीका सुरू केली आहे.

या सर्व घडामोडींवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ‘चिपी विमानतळ तयार करण्यामध्ये राणे यांचा सहभाग कुणीच नाकारु शकत नाही. राणे यांच्या काळात विमानतळाच्या कामाची सुरुवात झाली. मी मुख्यमंत्री असताना ते काम पूर्ण झालं. त्याचं एक उद्घाटन आम्ही केलं आहे. आता तिथून विमान उडणार आहे.

त्यामुळे मला असं वाटतं की या परिस्थितीत हा वाद न करता, कोकणाच्या विकासासाठी आणि कोकणाच्या पर्यटनाला खऱ्या अर्थानं चालना देणारं अशाप्रकारचं हे विमानतळ, याच्यावर फ्लाईट सुरु होणं हे कोकणासाठी अत्यंत महत्वाचं आहे. राणेंचे आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं अभिनंदन करतो. राज्य आणि केंद्राने समन्वयानेच काम करायचं असतं. त्यामुळे श्रेयवादाची लढाई नाही. राणेंचं योगदान कोणी नाकारु शकत नाही असे फडणवीस म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!