Share

नाशिकमध्ये रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमध्ये ११ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

Published On: 

मुंबई : नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी या घटनेवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

नाशिकमध्ये आधीच ऑक्सिजनची कमालीची कमतरता आहे. गंभीर बाब म्हणजे रुग्णालयातील या ऑक्सिजनवर अनेक गंभीर प्रकृतीच्या रुग्णांना हा ऑक्सिजन लावण्यात आला होता. यामुळेच या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ११ रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती सध्या मिळत आहे. नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त्यांनी या घटनेत १० ते १२ रुग्णांचा मृत्यू झाला असू शकतो शकतो अशी माहिती दिली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहेत. यामुळे सर्व ठिकाणाहून ऑक्सिजनची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. ही गळती थांबवण्यासाठी एकच धावपळ पाहायला मिळते.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!