Share

चिमुकल्या चाहत्याने फोडला टीव्ही; सोनू म्हणतो, ‘आता नवीन टीव्ही द्यावा लागेल’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता सोनू सूद कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देखील अनेक कोरोनाग्रस्त आणि गरजवंत लोकांना मदत आजही अहोरात्र मदत करत आहे. अनेकजण त्याच्या कामाचे कौतुक करत आहेत. त्याच्या या कार्यामुळे त्याचा चाहता वर्ग देखील प्रचंड वाढला आहे. त्याचे चाहते सुद्धा सोनूवर निस्वार्थीपणे प्रेम करतात. याचेच एक उदाहरण पाहायला मिळाले आहे.

तेलंगणाधील सोनू सूदच्या एका चिमुकल्या चाहत्याने सोनूच्या प्रेमाखातर चक्क घरातलाच टीव्ही फोडल्याचे समोर आले आहे. हा चिमुकला घरी सोनू सूदचा ‘ढुकुडु’ हा सिनेमा पाहत होता. अभिनेता महेश बाबू सोनूला कानशिलात लगावतो हा सीन पाहून चिमुकल्याला इतका राग आला की त्याने राग थेट टीव्हीवर काढला आणि चक्क टीव्हीच फोडून टाकला.

टीव्ही फोडल्याच्या पराक्रमाची बातमी सोनूला कळाली तेव्हा त्यानेही ट्विटरवर त्या न्युज चॅनेलच्या बातमीचा व्हिडीओ शेअर करत सोनूने लिहीले की, ‘टीव्ही फोडू नका. आता त्याचे वडील मला नवीन टीव्ही द्यायला सांगतील’, असे मजेशीर कॅप्शनही त्याने दिले आहे.

https://www.instagram.com/p/CP8V-ewgBZF/?utm_source=ig_embed&ig_rid=7ed16c82-0f78-488c-bfca-309560cb8d3c

याआधी देखील सोनू सुदचा असाच एक चाहता त्याला भेटण्यासाठी हैद्राबादहुन थेट मुंबईकडे पायी चालत निघाला होता. या युवकाने तब्बल ७०० किमी पायी चालत हैदराबादहून मुंबईपर्यंतचे अंतर पायी चालत पार केले होते. सोनू सूदने कोरोना काळात लोकांची निस्वार्थ सेवा केल्यामुळे लोक त्याची देवाप्रमाणे पुजा करतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!