औरंगाबाद : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी तसेच त्यांचे संगोपण व्हावे यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. अशा बालकांच्या मदतीसाठी चाईल्ड हेल्प लाईन क्रमांक १०९८ या क्रमांकावर संपर्क साधून गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी बुधवारी (दि.१९) चाईल्ड हेल्प लाईन बाबतचा माहितीफलक सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात यावा, असे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. महानगरपालिकामध्ये कार्यरत असणारी बालगृहे, निरिक्षण गृहांकरीता तत्काळ उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करुन पथकांतर्गत येथील कर्मचाऱ्यांचे तात्काळ लसीकरण करण्यात यावे अशा सूचना देत चव्हाण यावेळी म्हणाले की, कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होतांना या कालावधीमध्ये आपल्या बालकाचा ताबा कोणाकडे द्यावा ही माहिती रुग्णाकडून भरुन घ्यावी.
बालकांना सर्वोतोपरी संरक्षण उपलब्ध करुन देणे व अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार अथवा तस्करी सारख्या गुन्हेगारीमध्ये सापडणार नाहीत याची दक्षता घेणे, त्यांचे कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यकतेनुसार न्यायिक सल्ला व इतर सुविधा उपलब्ध करुन देणे. तसेच या बालकांचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याकरिता दक्षता घेणे, दत्तक प्रक्रीयेची आवश्यकता असल्यास प्रचलित मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक कार्यवाही करणे, बालकासाठी समुदेशनाची व्यवस्था करणे, आदी सूचना यावेळी चव्हाण यांनी संबंधित विभागाला दिल्या.
याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल गठीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंबंधी शासन निर्णय महिला व बालविकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी या टास्क फोर्सचे अध्यक्ष तर महिला व बाल विकास अधिकारी सदस्य सचिव तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांच्या लसीकरणावरून संभ्रम; केंद्राने स्पष्ट केली नियमावली
- ग्लोबल टेंडरही काढलं मात्र, अद्याप एकाही कंपनीचा प्रतिसाद नाही : आरोग्यमंत्री
- मंत्र्यांना कोर्टात उभं करुन दूध का दूध आणि पाणी का पाणी करु – गुणरत्न सदावर्ते
- मोदी फक्त गुजरातचेच प्रधानमंत्री, अशा संकट काळात पण त्यांना फक्त गुजरातच दिसतोय !
- ‘त्या’ भव्य अंत्ययात्रेला पोलीसच जबाबदार ; दोन अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली


