Share

‘त्या’ भव्य अंत्ययात्रेला पोलीसच जबाबदार ; दोन अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

Published On: 

पुणे : देशात दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या भीषण समस्या निर्माण करत आहे. यामध्ये आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे २०२० प्रमाणे याही वर्षी देशातकोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे. देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून त्यामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे.

अशी सर्व भीषण परिस्थिती असताना काही दिवसांपूर्वी पुण्यात माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराच्या अंतयात्रेला शेकडो तरुण दुचाकी घेवून ‘लव यू भाऊ’ असं म्हणत रस्त्यावर येवून त्यांनी दु:ख व्यक्त केलं, या घटनेची पुणे शहरातमधील नागरिकांमध्ये चर्चा आहे. पुण्यात दिवसेंदिवस भाई वाढतायत ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलं जात आहे. पुण्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. प्रशासकीय पातळीवर आणि पोलिसांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिवाचं रान केलं जात आहे. अशातच सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला 125 बाईकची रॅली काढल्याचं समोर आल्याने संताप व्यक्त केला जात होता.

या दुचाकी रॅलीवेळी केलेला निष्काळजीपणा सहकारनगर पोलिस ठाण्यातील दोन वरिष्ठ पोलिसांना भोवला आहे. त्यांची आर्थिक व सायबर गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यातील एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक व गुन्हे निरीक्षक आहे. या दुचाकी रॅली प्रकरणी आता पोलिसांचा निष्काळजीपणा उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गांभिर्याने दखल घेतली आहे.

गौतम गंभिरे आणि राजेंद्रकुमार कदम असे बदली करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. गंभिरे हे वरिष्ठ पोलिस निरीक्षक असून त्यांची आर्थिक व सायबर गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. तर कदम हे पोलिस निरीक्षक (गुन्हे) असू त्यांची सायबर गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. तर स्वाती देसाई यांची सहकारनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बिबवेवाडी परसिरातील सराईत माधव वाघाटेचा खून झाल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला शेकडो समर्थकांनी दुचाकीची रॅली काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याप्रकरणी १५० ते २०० जणांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी १५ पथके स्थापन करून ९६ पेक्षा अधिक जणांना अटक करून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!