मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लसींचा इतका मोठा तुडवडा जाणवत असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जगातील इतर कंपन्यांकडून लस उपलब्ध व्हाव्यात यासाठी ग्लोबल टेंडरही काढलं आहे. मात्र, यानंतर एकाही कंपनीनं अद्याप प्रतिसाद दिलेला नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासाठी केंद्र सरकारचं धोरणं कारणीभूत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘लस मिळवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत. देशातील कंपन्या सध्या आवश्यक प्रमाणात लस पुरवठा करु शकत नाहीत. त्यामुळे आपण ५ कोटी डोसचं सध्या ग्लोबल टेंडर काढलं असून २५ तारखेपर्यंत हे ग्लोबल टेंडर ओपन ठेवण्यात आलं आहे. पण अद्याप कुठल्याही कंपनीचा याला प्रतिसाद मिळालेला नाही. कारण या कंपन्यांना लस पुरवण्यासाठी आधी केंद्र सरकारच्या मंजुरीची गरज असते, त्याअनुषंगानेच या कंपन्या विचार करत असाव्यात’ असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सध्या महाराष्ट्रामध्ये लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. यामुळे लोकांचा संताप सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मंत्र्यांना कोर्टात उभं करुन दूध का दूध आणि पाणी का पाणी करु – गुणरत्न सदावर्ते
- अखेर ‘त्या’ वादावर पडदा ; जयंत पाटलांच्या प्रकल्पांना मंजूरी
- पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांतील कोरोनाचा आढावा घेणार
- पुलाखाली आढळला युवकाचा मृतदेह; बोरगावात एकच खळबळ
- बीसीसीआयच्या महिला आणि पुरुष संघातील भेदभावावर हरमनप्रितने टाकला पडदा, दिले ‘हे’ उत्तर


