Share

‘लोणावळ्यातील चिक्की प्रसिद्धच आहे, पण फडणवीसांनी फेमस केलेल्या ‘चिक्की’चे हाल सुरू!’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातून प्रीतम मुंडे यांचे नाव वगणळण्यात आले. यावरून पंकजा मुंडे नाराज असल्याचा चर्चा सुरू होत्या. पंकजा यांनी या अफवा असल्याचे सांगितल्यानंतरही या विषयाला पूर्णविराम मिळत नाहीये. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंकजा यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘लोणावळामधील चिक्की ही फार प्रसिद्ध आहे. मात्र, फडणवीस सरकारने या ‘चिक्कीला’ फेमस केले. पण, आता या ‘चिक्की’ चे काय हाल चालू आहे ते बघा’, असा टोला त्यांनी पंकजा मुंडे यांना लगावला.

त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे असं सांगताना नाना पटोले यांनी मला सुखाने जगू देणार नाहीत असंही म्हटलं आहे.

काय आहे चिक्की प्रकरण?
तत्कालीन महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नियम डावलून एकाच दिवशी २४ कोटींची कंत्राटे देणे, ई-निविदा प्रक्रिया न राबवणे, गरजेपेक्षा अधिक वस्तू खरेदी करणे आदी आरोप पंकजा मुंडेंवर होते. हा सगळा घोटाळा २०६ कोटी रुपयांचा असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. पण डिसेंबर २०१६ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंकजा मुंडे यांना क्लिनचिट देत या प्रकरणाची फाईल बंद केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!