मुंबई : शिवसेना आणि राणे कुटुंबात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याचे आपण अनेकदा अनुभवले आहे. मात्र, काल रविवारी कोकणात एक वेगळेच चित्र सर्वांना पहायला मिळाले. निमित्त होते वेगुर्ले नगरपरिषदेच्या वेगुर्ले सागररत्न मत्य बाजारपेठ लोकार्पणाचे. यावेळी शिवसेना खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना आमदार दिपक केसरकर आणि भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण, भाजपचे आमदार नितेश राणे एकाच व्यासपीठावर होते.
या कार्यक्रमात नितेश राणेंनी तर जाहीर भाषणातून सेना आणि भाजपच्या युतीवर भाष्य केले. हल्ली युतीची चर्चा बंद होती. पण हे चित्र पाहिल्यानंतर युतीची चर्चा करणाऱ्यांना चांगली झोप लागेल. या चित्रामुळे युतीची चर्चा नक्की रंगेल. वरिष्ठांनी आदेश दिला तर आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून काम करू असं वेगळे राजकीय संकेत भाजप आमदार नितेश राणेंनी दिले होते. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते.
पण या सर्व घडामोडींवर शिवसेनेचे नेते आमदार दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘वेगुर्लेतील कार्यक्रम राजकीय नव्हता. १३ वर्ष रखडलेला प्रकल्प पूर्ण झाल्याचा आनंद सर्वांना होता. म्हणून दोन्ही पक्षाचे नेते एका व्यासपीठावर आले. यावेळी नितेश राणे यांच्याशिवाय कोणीही राजकीय भाषण केलं नाही. त्यांनी विकासात सर्वांनी एकत्र असलं पाहिजे असं म्हटलं आहे. ही भूमिका आम्हाला मान्य आहे. पण राणेंना शिवसेना आणि भाजपा एकत्र येऊ शकेल असे वाटत असेल तर त्यांनी प्रतीविधानसभेत काय वक्तव्य केले हे आठवावे. आदित्य ठाकरेंचा डीएनए तपासला पाहिजे असे म्हणणे योग्य आहे का ? हे चरित्रहनन असून साध्या कुटुंबातील व्यक्तीनेही सहन केले नसते’.
‘राजकीय संबंध एकतर्फी कधीच सुधारत नाहीत. नितेश राणेंनी त्यांची विधाने तपासली पाहिजेत. त्याच्यात सुधारणा केल्यानंतर शिवसेना आणि भाजपा एकत्र येण्याची ही नांदी आहे म्हणण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे,’ असं दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- वेब सिरीजनंतर क्रीडाविश्वात ‘समांतर’ची पुनरावृत्ती! सचिन-मेसीची सारखीच कहाणी
- ‘शाळा अद्याप सुरू करू नयेत, कारण…’ ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भूमिका
- महाराष्ट्रात आज कोरोनाचे ८ हजार ५३५ नवे रुग्ण तर ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
- ‘…तर खांद्याला खांदा लावून काम करु’; नितेश राणेंच्या भाषणानंतर शिवसेना नेत्याने थोपटली पाठ


