🕒 1 min read
मुंबई: राज्यात गेल्या महिन्यापासून कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यासोबतच ओमायक्रॉनचे (Omicron) देखील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले असून शाळा ,कॉलेजही बंद ठेवण्यात आले आहे. मात्र आता सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे.
शाळा सुरु करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री ठाकरेंना काल प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण कमी आहेत, त्या ठिकाणी कोरोनासंबंधी सर्व नियम पाळून शाळा उघडण्यात येतील, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. यासंबंधी सर्व निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. हा निर्णय पहिली १ ते १२ च्या विद्यार्थ्यांबाबतही घेण्यात आला आहे. त्यामुळे २४ तारखेपासून आता शाळेची घंटा वाजणार आहे.
मुलांचे आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता ही आमची प्रथम जबाबदारी राहिली आहे. त्यामुळे पूर्णपणे स्थानिक प्रशासनाशी एकरूप राहून परिस्थितीचा आढावा घेण्यात यावा. आणि त्यानुसारच भविष्यातील निर्णय घेण्यात यावे, अशा सूचनाही वर्षा गायकवाड यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यात पालकांची संमतीही महत्वाची असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. मात्र कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. मात्र निवासी शाळेबाबत अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्री-प्रायमरी शाळाही उघडणार-
यावेळी पहिल्यांदाच प्री-प्रायमरी शाळाही उघडण्यात येणार असल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे पहिलीच्या विद्यार्थ्यांचीही आता शाळेची घंटा वाजणार आहे. अनेक संस्था, शाळा तसेच पालकांनी शाळा उघडण्यात याव्या, अशा मागण्या केल्या होत्या. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सर्व नियम पाळून उघडण्यासाठी परवानगी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- लस न घेतलेल्यांना धोक्याची घंटा; महानगरपालिकेचा दणका, महिनाभरात ६ लाखांचा दंड!
- राज्यातील महाविद्यालये सुरु होणार? उदय सामंत मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा
- प्रसिध्द कन्नड चित्रपट निर्माते प्रदीप राज यांचे कोरोनामुळे निधन
- “चंद्रकांत पाटील म्हणजे ‘टॉलस्टॉय’ नाही की, विद्यापीठातून त्यावर चर्चा व्हावी”, संजय राऊतांचे टीकास्त्र
- “नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा पराभव राऊतांच्या जिव्हारी, म्हणूनच निरर्थक बडबड करून ते नटसम्राटची उपमा सार्थ ठरवताहेत”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
