Share

मुख्यमंत्री ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेरले आहेत- रामदास आठवले

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वाद रंगला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. यावरच रामदास आठवले (Ramdas Athavale)  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना सल्ला देत म्हटले आहे की, दोन्ही काँग्रेस सोबत राहिल्यास शिवसेनेचे नुकसान होईल. त्यामुळे शिवसेना-भाजपने एकत्र यायला पाहिजे. मात्र मुख्यमंत्री ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेरले आहेत.

तसेच मुख्यमंत्र्यांची अनेकदा तब्येत ठिक नसते. अनेक वेळ आजारी असतात. निर्णय घेता येत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं घेरलेलं आहे. त्यामुळे त्यांना जे निर्णय घ्यायचे होते, ते होऊ शकले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रव्युहातून बाहेर पडणं आवश्यक आहे, असेही आठवले यांनी म्हटले आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी शिवसेनेने भाजपसोबत मैत्री केली पाहिजे. शिवसेनेच्या भविष्याचा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करून शिवसेनेने भूमिका बदलली पाहिजे. यासाठी मीसुद्धा प्रयत्न करणार आहे. यासाठीच मी संजय राऊत यांच्याशी बोलणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!