मुंबई : बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहात. त्यामुळेच तुम्ही कोकणासाठी सरकारी मेडिकल कॉलेज मागितलं. नाही तर लोक स्वत:साठी मेडिकल कॉलेज मागतात, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते नारायण राणे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर अनुल्लेखाने टीका केली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या याच टीकेवर आता नारायण राणे यांनी पलटवार केला आहे.
या टीकेला आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी प्रतिउत्तर दिलेले आहे. ते म्हणाले कि, ‘मी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलेले आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी,’ या शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे.
मेडिकल कॉलेजची घोषणा आजही मी करू शकतो. मात्र, मला खोटे बोलता येत नाही. कोकणात कॉलेज करायचे हे माझ्या लक्षात आहे. हे काम करू शकतो की नाही, याची खात्री होत नाही, तोपर्यंत मी तुम्हांला शब्द देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘लॉकडाऊन झाल्यास त्यातून उद्योग क्षेत्राला वगळावे’, ‘मसिआ’ची मागणी
- औरंगाबाद लॉकडाऊनबद्दल मनपा आयुक्तांची महत्त्वाची माहिती, म्हणाले..
- पंकजा मुंडे मतदारसंघात सक्रिय; पक्षातील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न
- भाजपनंतर ‘महाविकास’कडूनही धनगर समाजाची अवहेलना, धनंजय मुंडेंची खंत
- पालकमंत्री देसाई दोन दिवसात घेणार शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी बैठक


