Share

औरंगाबाद लॉकडाऊनबद्दल मनपा आयुक्तांची महत्त्वाची माहिती, म्हणाले..

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात सोमवारपासून दहा दिवसांचे लॉकडाऊन होणार अशी चर्चा सुरू आहे. यावर मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महाराष्ट्र देशाला महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, सोमवारपासून लॉकडाऊन लागू होणार नाहीये. पण कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात आहे. त्यामुळे लॉकडाऊन लावण्याची वेळ आलेली आहे. याबाबत जिल्हा प्रशासन आणि संबधित यंत्रणा निर्णय घेतील. पण सोमवारपासून लॉकडाऊन लागणार नाही हे निश्चित आहे.

शहरात सध्या कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या अनुषंगाने शहरात सोमवारपासून दहा दिवसांचे लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. परंतु, शहरात लॉकडाऊन लागणार या विषयी प्रशासनाने अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी सांगितले आहे. मात्र,शहर लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसत आहे.

कोरोनाचे सावट शहरात वाढत आहे. रुग्ण संख्या दररोज तीनशे पार जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहे. काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी रुग्ण संख्या वाढत राहिल्यास, लॉकडाऊन लावण्यासंदर्भात भाष्य केले होते. त्या अनुषंगाने वृत्तवाहिन्यांनी आज शनिवारी लॉकडाऊन संदर्भात बातमी प्रकाशित केल्यामुळे शहरात लॉकडाऊन संदर्भातल्या चर्चेला उधान आले होते. दरम्यान, औरंगाबादचे प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा माहिती अधिकारी मुकूंद चिलवंत आणि मनपाचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनची चर्चा फेटाळली आहे. अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही असे त्यांनी सांगितले. केवळ सोशल मीडियावर या प्रकारच्या चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले.

पण रविवारी किंवा सोमवारी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांची संयुक्त बैठक होण्याची शक्यता आहे. यावेळी बैठकीत लॉकडाऊन करायचा की आणखी काही पर्याय असेल याचा विचार केला जाणार असल्याचे समजते. दरम्यान, चुकीच्या माहितीमुळे औरंगाबादमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण परसले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!