🕒 1 min read
मुंबई : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवार दि. २१ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यात ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील, तसेच प्रत्यक्ष शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधतील.
सकाळी ९.३० वा. सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने काटगावकडे (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) प्रयाण. स.१०.२० वा. काटगाव येथे आगमन, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची, शेती व पिकांच्या नुकसानीची पाहणीकरून स. १०.५० वा. काटगाव येथून तुळजापूर मार्गे अपसिंगा-कात्री (ता. तुळजापूर)कडे प्रयाण करतील .
स. ११.३० वा. अपसिंगा येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची, शेती व पिकांच्या नुकसानीची पाहणी. दुपारी १२.०० वा. अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी १.०० वा. पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटीसाठी राखीव. त्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करतील दु. १.४५ वा. शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथून सोलापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व दु. ३.३० वा. सोलापूर येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
महत्वाच्या बातम्या-
- ‘मी या वयात इतकं फिरतोय, तू किमान बाहेर तरी पड…’ असं पवारांना म्हणायचं असेल : पाटील
- एमआयएम-वंचितला खिंडार,असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश
- पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!-जयंत पाटील
- कुणी कांदा साठा तपासायला सरकारी अधिकारी आला तर त्याला दांडक्याने सोलून काढा – सदाभाऊ खोत
- मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ? ; फडणवीस उत्तर द्या : अमोल मिटकरी


