पुणे : परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून सगळं वाहून गेल्याने खाणार काय? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या २ दिवसांत अनेक नेत्यांनी दौऱ्यांचा धडाका लावला आहे.
पंचनामे न करता सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. मात्र, पंचनामे सुरु असून कोणालाही वाऱ्यावर सोडणार नसल्याचं वक्तव्य काल सोलापूर दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. ठाकरेंच्या दौऱ्यानंतर कोणतीही ठोस घोषणा राज्य सरकारकडून केली गेली नसल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या दौऱ्यावर टीका केली आहे.
‘उद्धव ठाकरेंना प्रोटेक्ट करावं लागतं याचं वाईट वाटतं. शरद पवार हे काम मनापासून करत नसतील, पण सरकार एकत्र चालवायचं आहे म्हणून तस त्यांना करावा लागत असेल’. तर, ‘बाबा, या वयात मी इतका फिरतो तू किमान घराबाहेर पड, असं कादाचित पवारांना म्हणायचं असेल’, अशी जळजळीत टीका करत चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा उपयोग नाही
‘मुख्यमंत्र्यांनी धावता प्रवास करून उपयोग नाही. त्यांनी कोरडा प्रवास करू नये. ते मुख्यमंत्री आहेत. थेट निर्णय घेऊ शकतात. शेतकऱ्यांना थेट मदत देऊ शकतात,’ असा टोला देखील पाटलांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी महादेव जानकरांचा पक्ष आक्रमक
- नवरात्रोत्सव : पहा करवीरनिवासिनी अंबाबाईची आजची ‘ओमकाररूपिणी’ पूजा
- श्री तुळजाभवानी देवीची आज रथ अलंकाराने महापूजा
- जाणून घ्या पुणे विभागातील कोरोनाची नेमकी काय आहे स्थिती ?
- ठाकरेंचा कोरडा प्रवास उपयोगाचा नाही, थेट निर्णय घेऊन मदत करा : चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

