कोल्हापूर : केंद्र सरकारने शेतीमाल साठवणुकीवरील निर्बंध उठवले आहेत, तरीही कुणी कांदा साठा तपासायला सरकारी अधिकारी आलाच तर त्याला चोराप्रमाणे दांडक्याने सोलून काढा अशा सूचना माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकरी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
दरम्यान, राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट नुकसान भरपाई द्यावी, पीक कर्ज माफ करावे आणि उसाची एफआरपी एकरकमी द्यावी अशा विविध मागण्या सरकारकडे केल्याचेही त्यांनी सांगितले. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. कापूस, सोयाबीन, भुईमूग यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना आता तातडीच्या मदतीची गरज आहे , यामुळे कोरडवाहू शेतीला प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये तर बागायती शेतीला प्रति हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करावी. अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
तर, प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राकडे बोट दाखवणे म्हणजे रणांगणातून पळ काढण्याचा प्रकार असल्याची टीका खोत यांनी महाविकास आघाडी सरकावर केली आहे. केंद्र जेव्हा देईल तेव्हा शेतकऱ्यांना सर्व रक्कम द्या, पण तोपर्यंत पहिला हप्ता म्हणून राज्य सरकारने आपल्या निधीतून शेतकऱ्यांना मदत करायला हवी. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गेल्यावर्षी भाजप सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या, आता सत्ता तुमची आहे त्यामुळे ज्या ज्या मागण्या तुम्ही केल्या होत्या, त्या त्या मागण्यांची पूर्तता आता करा अशी मागणीही खोत यांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या
- आमिर खानचा मुलगा सिनेमाच्या ऑडिशन मधून रिजेक्ट !
- दोन महिन्यांपूर्वी चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झालेल्या संजय दत्त यांची कर्करोगावर मात
- ‘मी या वयात इतकं फिरतोय, तू किमान बाहेर तरी पड…’ असं पवारांना म्हणायचं असेल : पाटील
- श्री तुळजाभवानी देवीची आज रथ अलंकाराने महापूजा
- राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी महादेव जानकरांचा पक्ष आक्रमक

