🕒 1 min read
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी, लॉकडाऊन जरी नसला तरी कोरोनाच संकट मात्र कायम आहे. त्यामुळे सर्वानी काळजी घेतली पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे’ असं सांगितलं. सण, उत्सव येत असल्याने अधिक सतर्क राहिले पाहिजे असे सांगतानाच त्यांनी भाषणाच्या अखेरीस नवरात्री, दसरा, ईद, दिवाळीसह येणाऱ्या सणांच्या शुभेच्छा देखील जनतेला दिल्या.
आजच्या संवादामध्ये ते महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील शेती व मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीबद्दल अधिक काही मदतीची घोषणा करतील अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, मोदींनी केवळ १२ मिनिटे केलेल्या संबोधनात इतर कोणत्याही विषयांवर भाष्य न केल्याने मोठा हिरमोड झाला आहे.
मोदींच्या या संवादावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर केलेल्या टीकेच्या स्टाईलनेच टोला लगावला आहे. ‘मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ?? बिहार बद्दल प्रेम उतू येणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर द्यावे. केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अनाथ बाबत शांत का मोदी जबाब दो.’ असं ट्विट करत मिटकरींनी प्रहार केला आहे.
मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ?? बिहार बद्दल प्रेम उतू येणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर द्यावे. केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अनाथ बाबत शांत का मोदी जबाब दो.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 20, 2020
महत्वाच्या बातम्या-
- ‘मी या वयात इतकं फिरतोय, तू किमान बाहेर तरी पड…’ असं पवारांना म्हणायचं असेल : पाटील
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हा दारुडा माणूस – प्रकाश आंबेडकर
- राज्यपालांच्या अडचणीत वाढ; उच्च न्यायालयाच्या अवमानप्रकरणी नोटीस !
- कुणी कांदा साठा तपासायला सरकारी अधिकारी आला तर त्याला दांडक्याने सोलून काढा – सदाभाऊ खोत
- ठाकरेंचा कोरडा प्रवास उपयोगाचा नाही, थेट निर्णय घेऊन मदत करा : चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
