Share

एमआयएम-वंचितला खिंडार,असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई   – महाराष्ट्रातील एमआयएम आणि वंचितच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज खासदार फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.हा जाहीर प्रवेश राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात काल पार पडला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार फौजिया खान, राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार बाळासाहेब पाटील, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा  पेडणेकर, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते.

यावेळी कुर्ला विधानसभा क्षेत्रातील एमआयएम पक्षाकडून उमेदवारी लढवलेले प्रा.अविनाश गोपीचंद बर्वे, कन्नमवार नगर विक्रोळी पूर्व येथील एमआयएम वरीष्ठ नेते विकी बाळासाहेब जाधव,मातंग समाजाच्या नेत्या आणि बचत गटांच्या माध्यमातून मुंबईत नेटवर्क उभारलेल्या स्मिता मल्हारी साठे यांनी प्रवेश केला.

याशिवाय १३ वर्षांपासून ऑल इंडिया रेडिओ मुंबई येथे पत्रकार म्हणून कार्यरत असलेल्या भारती गांधी, ठाणे पूर्व येथील वंचितचे नेते मंगेश लक्ष्मण सूर्यवंशी,विक्रोळी पूर्व येथील वंचितचे नेते फिरोज खान, मानखुर्द येथील मातंग समाजाचे नेते विजय क्षीरसागर, फलटण येथील धनगर समाजाचे नेते बाळासाहेब शंकरराव मदने, मानखुर्द येथील बंजारा समाजाचे नेते सुनील चव्हाण आदींसह महाराष्ट्रातील विविध भागातील कार्यकर्ते व नेत्यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!